‘काजळकाठ’ म्हणजे आतल्या कोलाहलाची कविता आहे. ही कविता वाचून मी खूप अस्वस्थ झालो. अस्वस्थतेचा वाचनानंद देणारी ही कविता मला अतिशय आवडली आहे!
कमी वयात आपली कविता खूपच प्रौढ आणि प्रगल्भ झाली आहे. आपण आपले टोकदार जीवनानुभव आणि निरीक्षणे खूपच संयमितपणे मांडली आहेत.
ग्रंथालीने पुस्तकाची निर्मिती अतिशय अप्रतिम केली आहे!
मनोजची प्रस्तावना वाचकाचे बोट धरून त्याला कवितेकडे घेऊन जाते. साहित्य क्षेत्रात प्रवेश करत असतानाच आपण षट्कार मारला आहे.
‘जळत्या काळाची साक्षीदार’ ह्या भागातील कवितेत आपली सामाजिक जाण अतिशय टोकदारपणे अभिव्यक्त झाली आहे. ही कविता वाचकांना अंतर्मुख करते.
उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी आपले मनापासून, अगदी मनापासून अभिनंदन! भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
डॉ. सुरेश सावंत
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, विचारवंत